मयत शाळकरी विद्यार्थ्याच्या अपघाताची चौकशी करुन वेताळ परिवाराला न्याय द्यावा
नगर : शहरात अनेक रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे त्यामुळे शहरातील अनेक नागरिक, शाळकरी विद्यार्थीयांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. याच वाहतूक कोंडीमुळे अनेक अपघात होत असून नुकतेच अवघ्या १२ वर्षाच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला असून त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेने नागरिक हळहळ व्यक्त करत आहे, जिल्हाधिकारी यांचा दिवसा अवजड वाहतूक बंदीचा आदेश अस्रताना या आदेशाला न जुमानता सर्रासपणे शहरात अवजड वाहने रस्त्यावर येत आहेत. शळेतील विद्यार्थी जीव मुठीत घेऊन रस्त्यांवरुन ये जा करत आहेतयाच वाहतूक कोंडीमुळे व अवजड वाहनांच्या घुसखोरीमुळे अनेक अपघात होऊन निष्पाप जीव जात आहेत. त्यामुळे विविध प्रमुख रस्त्यावरील चौकाचौकात वाहतूक पोलिस असणे आवश्याक व गरजेचे आहे ते ड्यूटीवर असतील तर निश्चीतच वाहतूक सुरळीत होईल आणि अपघात टाळता येईल अशी मागणी कल्याण रोड परिसरातील नागरिकांनी शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्याकडे निवेदनातून केली. यावेळी पारुनाथ ढोकळे, दत्ता गाडळकर, ओंकार शिंदे, पै. महेश लोंढे, अँड. युवराज शिंदे, भगवान काटे, पंडितराव हराळ, बबन खामकर, रोहिदास दातीर, मदन काशीद, प्रद्युम्न सोनवणे, सुरेंद्र बोर्हाडे, राजाराम रोहकले, विनायक आडेप, रितेश आडेप, विश्वास खिलारी, योगेश डेरे, कांतीलाल ढवळे,सचिन येठेकर, हरिभाऊ भोस, सुशीलकुमार नन्नवरे, तेजस पवार, जयवंत ठाणगे, ज्ञानदेव आठरे, गणेश गाडगे, संतोष ठाणगे, अँड. अभिजित देशमुख, निलेश बाविस्कर, अनंत आढाव, सुखदेव हापसे,अँड अभिजित देशमुख, देवेंद्र ढोकळे आदी उपस्थित होते,
निवेदनात पुढे म्हंटले की, कल्याण रोड परिसरात सीना नदीवरील पुलाचे काम सुरु आहे या महामार्गावरुन अनेक अवजड वाहने शहरात प्रवेश करत आहे. त्यामुळे नेप्ती नाका, दिल्लीगेट परिसर, सिद्धी बाग चौक, जुने कोर्ट, आप्पू हत्ती चोक, सिव्हील हॉस्पीटल चौक, वाडिया पार्क, महात्मा गांधी पुतळा चौक या ठिकाणी वाहतूककोंडी प्रचंड प्रमाणात होत आहे कारण याच रस्त्यावर अनेक कार्यालये, शाळा, दुकाने आहेत. त्यामुळे या वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक पोलीसांची कायम स्वरुपी नेमणूक करावी तसेच अवजड वाहनांना किमान सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत प्रवेश बंदी करावी त्यामुळे निश्चीत वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊन अपघात टाळतील. दोन दिवसांपूर्वी शहरातील बालिकाश्रम रोडवर शाळकरी विद्यार्थी अथर्व वेताळ याचा अपघाती मृत्यू झाला तरी या अपघाताची सविस्तर चौकशी लवकरात लवकर करुन वेताळ परिवाराला न्याय द्यावा. अशी मागणी करत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी देखील नागरिकांनी चर्चा केली.
शहरात अवजड वाहनांना बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करा
अहमदनगर शहरात दिवसेंदिवस रहदारीची समस्या वाढत असून त्यामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये जीवित हानी होत आहे. शहरात अवजड वाहनांना बंदी असून देखील त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने महिनाभरात झालेल्या दोन अपघातांमध्ये दोन दुर्दैवी मृत्यूच्या घटना घडलेल्या आहेत. बालिकाश्रम रोड परिसरात रेसिडेन्शिअल हायस्कूलचा विद्यार्थी अथर्व वेताळचा अपघाती वाहनाच्या धडकेने दुर्दैवी मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर कल्याण रोड परिसरातील नागरिकांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. अशी माहिती दत्ता गाडळकर यांनी दिली,
शहरात दुर्दैवी अपघाती घटना पुन्हा घडू नये म्हणून तात्काळ प्रभावीपणे उपाययोजना कराव्यात,.शहरातील सर्व शाळा परिसरांमधील अतिक्रमणे तात्काळ हटविण्यात यावीत तसेच शहरातील अति वर्दळीच्या शाळा परिसरांमध्ये वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी यावेळी पारुनाथ ढोकळे यांनी केली.
शहरातील अथर्व वेताळच्या अपघाती निधनाची घटना अतिशय दुर्दैवी व मनाला व्यतीत करणारी असल्याचे सांगून याबाबत तात्काळ प्रभावी उपाय योजना करणार असल्याचे सांगत शाळा परिसरातील अतिक्रमणे हटवणे ही बाब महानगरपालिकेच्या कार्यकक्षेतील असून याबाबत त्यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल, तसेच अति रहदारी असलेल्या शाळा परिसरांमध्ये तात्काळ वाहतूक शाखेचे पोलीस नियुक्त करण्यात येतील असे आश्वासन पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी यावेळी दिले.