Tuesday, June 24, 2025

नगर जिल्ह्यात वादळी वार्‍यासह पाऊस, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी शेतकन्यांना सतर्क राहण्याच्या सुचना

अहमदनगर -जिल्ह्यातील काही भागात शुक्रवारी अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली, तर पिकांचेही नुकसान झाले अहमदनगर शहर, कोपरगाव, पारनेर, अकोले आदी भागात वादळी वार्‍यासह पाऊस झाला. पावसाने उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली. जोरदार वार्‍यासह झालेल्या पावसामुळे चारा पिके जमिनदोस्त झाली. हवामान खात्याने जिल्ह्यात ९ हे १३ मे या कालावागत वादळी, वान्यासह पावसाचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी नागरिक, शेतकन्यांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.

अकोले तालुयातील मुळा पट्ट्यात शुक्रवारी दुपारी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. कोतूळ, वाघापूर, बोरी, धामणगाव पाट, अभीळ, मण्याडो, करंडी, ब्राह्मणवाडा परिसरांतील शेतीला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला.
या पावसाने अनेक ठिकाणी घरांचे व छपरांचे पत्रे उडाले. टोमॅटो व झेंडू, चारापिके यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.

वीज पडून गाय दगावली
शुक्रवारी दुपारी संगमनेरातील पठार भागात अवकाळी पाऊस आला. त्यात पठार भागातील गारोळे पठार (कुरकुंडी) येथील मनोहर भाऊ भुतांबरे या शेतकयाची एक गाय वीज पडून दगावली. याचा तलाठी शेख यांनी पंचनामा केला. शेतातील बांधलेल्या एका गायीवर वीज पडल्याने ती मृत्युमुखी पडली.

अकोल्यात एकाचा मृत्यू; पारनेरमध्ये आठ शेळ्या ठार
शुक्रवारी जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वार्‍यासह पाऊस झाला. अकोले तालुक्यातील राजून येथे वीज कोसळून पंढरीनाथ जयवंत मुर्तडक (वय ७५) या शेतकर्‍याचा मृत्य झाला. जामखेड येथे वीज कोसळून बैल तर पारनेर तालुक्यातील पुणेवाडी येथे वीज कोसळून आठ शेळ्या ठार झाल्या. पारनेरमध्ये अनेक ठिकाणी वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles