पेट्रोल डिझेल संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं वक्तव्य केलेय. अमरावती येथील ड्रायव्हिंग स्कूलच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. देशातून पेट्रोल आणि डिझेल संपवण्याचा मी संकल्प केला असल्याचे नितीन गडकरी यांनी केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी रस्ते अपघातामध्ये दरवर्षी मृत्यू पावणाऱ्यांबद्दल आणि त्याच्याबाबतच्या कारणावरही त्यांनी भाष्य केले.
भारतामधून येणाऱ्या काळात पेट्रोल डिझेल हद्दपार करणार आहे. तसा मी संकल्प केला आहे. येणाऱ्या काळात वाहतूक पद्धतीत ही बदलत जाणार आहे. मेळघाटसारख्या परिसरात ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटर सुरू होणं गरजेचे आहे… देशात ड्रायव्हरची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. येणाऱ्या काळात ड्रायव्हरने फक्त आठ तास ड्रायव्हिंग करावे असा नियम करणार असल्याचेही यावेळी गडकरी म्हणाले.आपल्या देशात साडेचार कोटी रोजगार देणारी ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे. यामध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. येणाऱ्या काळात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये भारत जगात पहिला क्रमांकावर जाईल, असा विश्वास गडकरींनी यावेळी व्यक्त केला.
देशात शेतकऱ्यांना समृद्ध करण्याकरता इथेनॉल पॉलिसी आणली, ही इकॉनॉमी दोन लाख कोटींवर पोहोचली आहे.
येणाऱ्या काळात ट्रान्सपोर्ट सेक्टर बदलत चालले असून इलेक्ट्रिक व्हेईकल व इथून वर चालणारे वाहन रस्त्यावर धाव लागतील.
ज्यावेळी मुंबई-पुणे महामार्ग बांधण्याची मला संधी मिळाली. दोन तासांत जाता येईल, असे सांगितले होते. त्यावर माझी खिल्ली उडवली गेली. पण तुम्ही वास्तव पाहत आहात. लोक दोन तासांत मुंबईवरुन पुण्याला जाऊ शकता. देशात आशाप्रकारचे अनेक रस्ते तयार केले आहेत. काश्मीर ते कन्याकुमारी हा रस्ता तयार केलाय. त्यामध्ये जोडरस्ते तयार केले आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांना याचा फायदा होणार आहे.
भारतामध्ये लवकरच 400 इथेनॉल पंप सुरू करण्याची योजना आहे. इथेनॉल वापरामुळे ट्रान्सपोर्ट स्वस्त होईल, असेही गडकरी यावेळी म्हणाले.