Sunday, July 21, 2024

राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात नगरमध्ये जोरदार आंदोलन; दुधाला ४० रू दर देण्याची मागणी

अहमदनगर -‘दुधाला किमान ४० रुपये दर मिळावा’ या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राहुरीत रास्ता रोको केला. राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी होते. यावेळी नगर – मनमाड महामार्ग अडवत शेतकऱ्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी, दुधाला किमान ४० रुपये दर देण्याचा निर्णय घ्या. याबाबतचा निर्णय न झाल्यास सोमवारनंतर शांत बसणार नाही. सरकारचं नाक दाबल्याशिवय तोंड उघडत नाही. या मागण्यांबाबत निर्णय घ्यावा अन्यथा मुंबईला जाणारा दूध पुरवठा रोखू, असा थेट इशारा राजू शेट्टी यांनी दिला.तसेच, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी यापुढेही शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी बरोबर राहावे. चारा, पशुखाद्य, खतांचे दर वाढत आहेत. परंतु दुधाचे दर दररोज घटत चाललेले आहे. त्याचप्रमाणे शासनाने कांद्याच्या दराबाबत निर्यात बंदी करून पाडले. सोयाबीन, कापूस, तुर आधी शेतमालाचे दर पाडण्यासाठी बाहेरून आयात केले. या शासनाचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. असेही ते म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles