Friday, December 1, 2023

डंपरच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू ,अहमदनगर शहरातील घटना….

नगर शहरातून बेकायदेशीररित्या प्रवेश करणार्‍या जड वाहतुकीमुळे डीवायएसपी चौकात घडलेल्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. शेख महंमद अनीस खलीद (वय 19 रा. सीआयव्ही कॉलनी, मुकुंदनगर) असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. गुरूवारी (दि. 2) सकाळी हा अपघात झाला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, शेख हा सायकलवरून जात असताना त्याला हायवा डंपरने धडक दिली आहे. पोलिसांनी डंपरसह चालकाला ताब्यात घेतले आहे.

शेख महंमद अनीस खलीद हा शालेय विद्यार्थी शाळेतून आपल्या घरी जात असताना डीवायएसपी चौकामध्ये 14 टायर डंपरने शेख यास उडवले. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे नगर शहरातील अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरामध्ये सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

नगर-सोलापूर महामार्गावरून नगरच्या दिशेने येणारी अवजड वाहने अरणगाव बाह्यवळण रस्त्याने, नगर-पुणे व नगर-कल्याण महामार्गावरील वाहने निंबळक बाह्यवळण रस्त्याने व नगर-मनमाड आणि नगर-संभाजीनगर महामार्गावरील अवजड वाहने वडगाव गुप्ता बाह्यवळण रस्त्याने वळवण्यात आली आहेत. त्याशिवाय इतर उपाययोजनाही करण्यात आल्या मात्र तरीदेखील वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे जड वाहतूक सर्रासपणे शहरांमध्ये प्रवेश करत असून याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: