Home नगर जिल्हा राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची तयार होणार ‘एज्युकेशन हिस्ट्री’

राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची तयार होणार ‘एज्युकेशन हिस्ट्री’

0

अहमदनगर-राज्यातील पहिले ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची एज्युकेशन हिस्ट्री तयार करण्यात करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचा आधारकार्डनूसार १२ अंकी ‘अपार आयडी’ तयार करण्यात येणार आहे..केंद्र सरकार यासाठी आग्रही असून पुढील महिन्यात राज्यातील जिल्हा परिषदांच्या शिक्षण विभागातील संगणक विभागाच्या समन्वयकांना मुंबईमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद (एमपीएसपी) याबाबत पत्र पाठवत जिल्हा परिषद शिक्षण विभागाला याबाबत प्राथमिक माहिती दिली आहे.

यापुढे पहिली ते बारावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचा १२ अंकी अपार आयडी तयार करण्यात येणार आहे. या आयडीमध्ये संबंधीत सर्व शैक्षणिक माहिती संकलित करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आधार प्रामाणिकरण झालेले आहे. त्या विद्यार्थ्यांचे यू- डायस प्रणालीमधून माहिती घेऊन ‘अपार आयडी’ तयार करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला याबाबत सुचना करत विद्यार्थ्यांची एज्युकेशन हिस्ट्री तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात आणि नगर जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यातील ज्या विद्यार्थ्यांची ‘आधार’ची माहिती प्रामाणिकरण झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती अपार आयडीमध्ये टाकण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावीपर्यंत शैक्षणिक रेकॉर्ड तयार होणार आहे. यासाठी सरकारच्यावतीने पोर्टल विकसीत केलेले असून ते अपार आयडीचे काम पूर्ण होईपर्यंत कार्यान्वित होणार आहे.

दरम्यान, याबाबत केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद (एमपीएसपी) सुचना देण्यात आल्या असून त्यांच्याकडून प्रत्येक जिल्हा परिषदेला अपार आयडी प्रकल्पाबाबत अवगत करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या तयार करण्यात येणाऱ्या १२ अंकी अपार याडीचे काम सुरू करण्यापूर्वी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका शिक्षण विभागातील संगणक विभागाच्या समन्वयक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुढील महिन्यांत (ऑक्टोबरमध्ये) हे प्रशिक्षण मुंबईत होणार असून याबाबत सुचना नगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत.

विद्यार्थ्यांचा अपार आयडी तयार झाल्यावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड तयार होणार असल्याने त्यांचे एका शाळेसह दुसऱ्या शाळेत होणारे स्थालांतर, जिल्ह्या बाहेर व राज्याबाहेर होणाऱ्या स्थलांतर यासह अन्य महत्साचे ऑनलाईन रेकार्ड तयार होणार आहे. यामुळे कोणत्या शाळेत किती पट संख्या आहे. ती कमी किंवा जास्त याची माहिती ऑनलाईन सरकारला पाहता येणार आहे.
नव्याने विद्यार्थ्यांचा तयार होणाऱ्या अपार आयडीमुळे त्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सुविधांसह त्यांची अभ्यासातील प्रगतीचा अहवाल, शाळा बाह्य विद्यार्थ्यांची माहिती, प्रत्येक शाळेचा पट, शाळा गळतीचे अचूक प्रमाण आदीची माहिती ही डिजीटल पध्दतीने सरकारच्या नियंत्रणात उपलब्ध होणार आहे. यामुळे भविष्यातील विद्यार्थ्यांचे धोरण आखतांना या माहितीचा मोठा उपयोग होणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here