अहिल्यानगर : जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांतील १५१ उमेदवारांनी सोमवारी (दि. २३) अंतिम निवडणूक खर्च निवडणूक आयोगाला सादर केला. यामध्ये सर्वाधिक ३० लाख ९ हजार २३० रुपयांचा खर्च शिर्डी मतदारसंघातील भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांचा आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अहमदनगर मतदारसंघातील अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांचा आहे. त्यांनी २९ लाख ७३ हजार २६८ एवढा खर्च केला आहे; तर तिसऱ्या क्रमांकावर श्रीरामपूर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले आहेत. त्यांनी २८ लाख ९३ हजार ४४८ रुपये खर्च केला आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी ४० लाखांची उमेदवारी खर्चमर्यादा निश्चित होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून उमेदवारांना निवडणूक खर्चाची नोंद ठेवावी लागली, तर संबंधित मतदारसंघातील निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षात ‘सँडो रजिस्टर’वर दरपत्रकाच्या सूचीनुसार नोंद घेण्यात आली. या कक्षाने निश्चित करण्यात आलेल्या दोन दिनांकांना निवडणूक खर्च निरीक्षकांच्या समक्ष उमेदवारांच्या खर्चाची तपासणी व पडताळणी करण्यात आली. उमेदवारी अर्ज ते मतदान या दरम्यानच्या काळात ही प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर अंतिम तपासणीसाठी उमेदवारांना निकाल जाहीर झाल्याच्या ३० दिवसांत सर्व उमेदवारांचा खर्च अंतिम करण्यात आला.
मतदारसंघ व उमेदवारनिहाय अंतिम खर्च (रुपये)
अकोले –
किरण लहामटे – २८,७४,४८८
अमित भांगरे – २५,७४,३७७
वैभव पिचड – २४,६९,६०५
संगमनेर-
अमोल खताळ – २३,५७,४६०
बाळासाहेब थोरात – २८,३१,४६७
शिर्डी –
राधाकृष्ण विखे पाटील – ३०,०९,२३०
प्रभावती घोगरे – १८,८०,७८०
कोपरगाव –
आशुतोश काळे – २४,०१,२३५
संदीप वर्पे – १९,२२,००६
श्रीरामपूर –
हेमंत ओगले – २८,९३,४४८
लहू कानडे – २७,९७,८८७
भाऊसाहेब कांबळे – १५,४२,३२८
पाथर्डी –
मोनिका राजळे – २०,०४,१६१
प्रताप ढाकणे – २०,४८,१५२
चंद्रशेखर घुले – १३,६०,५७६
हर्षदा काकडे – १९,११,२७२
राहुरी
शिवाजी कर्डिले – २६,५९,७६९
प्राजक्त तनपुरे – २६,३२,५३३
पारनेर –
काशीनाथ दाते – २२,७७,५९९
राणी लंके – १२,०८,५३०
अहमदनगर शहर
संग्राम जगताप – २९,७३,२६८
अभिषेक कळमकर – १७,९१,१२५
श्रीगोंदा –
विक्रम पाचपुते -१४,१७,६४७
राहुल जगताप – १५,८०,६२२
अनुराधा नागवडे – १६,६२,१००
अण्णासाहेब शेलार – ७,९४,७४०
कर्जत-जामखेड –
रोहित पवार – २४,१२,०२४
राम शिंदे – २२,२२,११३
नेवासा –
विठ्ठल लंघे – २४,३४,५५४
शंकरराव गडाख – १८,६०,२९२
बाळासाहेब मुरकुटे – १७,७१,९०६






