नगर बीड परळी रेल्वे नगरहुन मराठवाड्यात धावली
नगर बीड परळी रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत अंमळनेर ते विघनवाडी पाचव्या टप्प्याची शुक्रवारी चाचणी यशस्वी
अमळनेर ते विघनवाडी चाचणी यशस्वी
ताशी 120 किलोमीटर वेगाने धावली रेल्वे
अहमदनगर- बहुचर्चित असणारा रेल्वे मार्ग म्हणजे ?
नगर बीड परळी रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत अंमळनेर(भांड्याचे) ते विघनवाडी 30 किलोमीटर अंतराची चाचणी ताशी 120 कि मी वेगाने शुक्रवारी घेण्यात आली. लवकरच नगर ते बीड पर्यंत लोहमार्ग चे काम पूर्ण होणार असून त्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांचा प्रवास सोपा व सुखकर होणार आहे.मराठवाड्यातील प्रवाशांची प्रतीक्षा आता संपणार आहे.
या सर्व लोहमार्गामध्ये डिझेल इंजिनचा वापर करण्यात आला आहे. गेल्या सात वर्षांपासून या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे यापूर्वी नगर ते नारायणडोह, नारायणडोहा ते सोलापूर वाडी,सोलापूर वाडी ते आष्टी,आष्टी ते अंमळनेर या मार्गाची चाचणी घेण्यात आली आता शुक्रवारी दि 9ऑगस्ट रोजी 30 किलोमीटर रेल्वे मार्गाची चाचणी यशस्वीरित्या घेण्यात आली.
आता एकूण 95 किलोमीटर अंतराची चाचणी पूर्ण करण्यात आली आहे. तसेच या महत्त्वकांक्षी रेल्वे मार्गामध्ये महत्त्वाचे म्हणजे
या रेल्वे मार्गावर अनेक मोठे पूल बांधण्यात आले.त्यासाठी मोठे तांत्रिक कौशल्य वापरून दक्षिण रेल्वे वरील सर्वात मोठा गल्डर टाकून रेल्वे रूळ अंथरण्यात आले आहेत. 500 मीटर लांबीचे व 18 मीटर उंचीचे नऊ मोठे पूल बांधण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे गाड्या धावण्यासाठी लोहमार्गाला बळकटी मिळणार आहे. शुक्रवारी झालेल्या चाचणीमध्ये या रेल्वे लोहमार्गाचा नेमका वेग काढण्यात आला. विघनवाडी ते परळी पर्यंतचा टप्पा पूर्ण होण्यास अजून एक वर्ष कालावधी लागू शकतो तसेच यावेळी ताशी 120 वेगाने धावली रेल्वे
अशी माहिती उप मुख्य अभियंता बांधकाम राकेश कुमार यादव यांनी दिली.
या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अमळनेर (भांड्याचे)
ते विघनवाडी लोहमार्गाची चाचणी घेण्यात आली.
रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्राशकीय अधिकारी ए के पांडे, मुख्य अभियंता राजकुमार वानखेडे, उप मुख्य अभियंता राकेश कुमार यादव,
सहाय्यक कार्यकारी अभियंता एस सुरेश,
कार्यकारी अभियंता अवधेश मीना,
सीनियर सेक्शन इंजिनिअर विद्याधर धांडोरे
सिनियर सेक्शन इंजिनिअर सत्येंद्र रा.कुवर,
सिनियर सेक्शन संजय श्रीवास्तव
एक्झिकेटीव, इंजिनिअर आदी उपस्थित होते.