आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा 22 जागांवर दावा असल्याचे संकेत शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केला. या दाव्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राहुल शेवाळे यांना फटकारलं आहे. हे माईकवरून सांगितलं जातं का? त्यांना 22 जागा लढवायच्या आहेत, हे माईकवरून सांगण्याची आवश्यकता नसते, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.
‘22 जागा लढायच्या असतील तर सर्वपक्षीय म्हणजेच आमच्या तीन पक्षांची बैठक एकत्र होईल तेव्हा आपलं मत व्यक्त करायचं असतं. कोणत्या जागा, किती जागा लढायच्या हे त्या त्या ठिकाणी असणारे सर्व्हे, त्याठिकाणी असणारी शक्ती याच्या आधारावर ठरतं. आकड्यांच्या आधारावर युती थोडी होते? युती एकमेकांच्या सहकार्याने, त्या ठिकाणचं आकलन आणि मुल्यांकन करून होते,’ असं मुनगंटीवार म्हणाले.
जागा वाटप ‘माईक’वर सांगून होत नसते… भाजपने शिंदे गटाला फटकारले…
- Advertisement -