Tuesday, February 18, 2025

राज्यात साखर कारखान्यांच्या ऊस गळीत हंगामाची तारीख ठरली…

मुंबई: राज्यातील साखर कारखान्यांचा #ऊस गळीत हंगाम येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,त्यानुसार कारखान्यांनी व साखर आयुक्तालयाने कार्यवाही करावी,अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री समितीच्या बैठकीत दिल्या. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते

ऊस गाळप आढावा व हंगाम नियोजनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीच्या बैठकीमध्ये सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील, साखर कारखाना संघाचे संचालक प्रकाश आवाडे, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles