सोशल मीडियावर ) देसी जुगाडचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकाची क्रिएटिव्हिडी खूपच जबरदस्त असते. हे व्यक्ती कमी खर्चात अशा वस्तू बनवतात की त्यांच्या कल्पनाशक्तीची कमालच असते. अशाप्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि ते पाहून प्रत्येक जण थक्क होतो. अनेकवेळा या लोकांची क्रिएटिव्हिटी पाहून उद्योगपती आनंद महिंद्राही त्यांची स्तुती करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत.
सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एका व्यक्तीने कारमध्येच उसाच्या रसाची मशीन बसवली आहे. ही कार तो गावोगावी फिरवत ऊसाचा रस विकतो. या व्यक्तीची ही क्रिएटिव्हिटी पाहून नेटिझन्सही हैराण झाले आहेत. या व्हिडीओवर कमेंट्स करत नेटिझन्स त्याचे कौतुक करत आहेत.
भारत में कुछ भी संभव हैं कार में ही लगा दिया गन्ने का मशीन 😜😅 pic.twitter.com/hzc7a9hyvy
— छपरा जिला 🇮🇳 (@ChapraZila) May 9, 2024