गायक संगीतकार सलील कुलकर्णी यांनी ‘एका माकडाने काढले दुकान’ या गाण्याचा भन्नाट एडिटेड व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ‘द आर्चीज’ चित्रपटातील सुहाना खानच्या डान्सच्या मागे ‘एका माकडाने काढले दुकान’ हे गाणं लावून भन्नाट एडिट केलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
सलील कुलकर्णींनी सुहानाच्या त्या व्हायरल व्हिडीओ संदर्भात लिहिल. ते म्हणाले, “आता काही दिवसांपूर्वी हे गाणं या धमाल एडिटिंग सकट बघायला मिळालं…ते सुद्धा व्हायरल झालं..आता तर मी निषेध वगैरे ओलांडून…हसण्याच्या स्टेजला आलो आहे… विंदांच्या घरी बसून त्यांना हे गाणं ऐकवलं होतं…त्यांनी हा व्हिडिओ पाहिला असता तर ‘माझ्या मना बन दगड’ नावाची त्यांची कविता ऐकावयाला त्यांना अजून एक कारण सापडले असते…तर ‘एका माकडाने काढले दुकान’ या गाण्याचा प्रवास गमतीशीर चालू आहे…आजची छोटी मुलं सुद्धा ते गाणं ऐकतायत…विंदा….आपलं गाणं हिट आहे…”