अहमदनगर शेवगाव : तालुक्याच्या पूर्व भागातील एका युवकाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेनंतर गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले असून तालुक्यात खळबळ उडाली आहे.
संबंधितांनी शेअर मार्केटच्या नावाखाली, सुमारे पाच ते सहा हजार कोटी रुपयांच्या ठेवी जमा केल्याची चर्चा सुरु आहे. परिणामी तालुक्यातील उलाढाल जवळपास ठप्प झाली आहे. दुर्दैव म्हणजे ही बाब प्रशासनाला माहिती असून देखील अद्याप दखल घेऊन कार्यवाही केलेली नाही. अनेक प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी देखील गुंतवणूक केल्याची चर्चा रंगली आहे. या ठेवीच्या मोबदल्यात महिन्याला सुमारे ७ ते २२ टक्के इतका प्रचंड परतावा दिला जात असल्याने अनेक लोक गुंतवणूक करण्याकडे ओढले गेले आहेत.
सुरवातीला शेअर मार्केट व्यवसाय सुरु केलेल्या संबंधितांनी मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा करुन वेळेवर परतावा देत ग्राहकांचा विश्वास जिंकला. अवघ्या ४ ते १० महिन्यात ठेव डबल करुन मिळाल्या. त्यामुळे भरमसाठ मिळणारा परताव्याची तालुक्यात चर्चा रंगली. परिणामी अनेकांनी ठेव पावत्या मोडून, जवळचे अडीअडचणीला ठेवलेले धान्य विकून, कडधन्य, सोसायटी, कर्ज काढून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. स्वयंघोषित अर्थतज्ज्ञांनी सोशल माध्यमर याबाबतच्या पोस्ट टाकून अधिक प्रसिध्दी केली.
शेअर मार्केट व्यवसाय करणाऱ्या लोकांचा थाट आलिशान कार्यालये पाहून अनेक युवक या व्यवसायाकडे वळाले. काही महिन्यात गावागावात कार्यालये सुरु झाली. गावागावात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या देखील प्रचंड वाढली. मोठ्या थाटात सुरु केलेल्या कार्यालयांना कुलूप दिसू लागले. त्यातील काही जणांनी ठेवी देण्यास टाळाटाळ करुन, सुमारे चार ते पाच जणांनी पळ काढल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
आपली आयुष्यभराची कमाई बुडणार असे दिसत असल्याने अनेक गुंतवणूकदारांना धक्का बसला आहे. यातील एकाने विशाल औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. तो युवक स्वस्त असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
शेअर मार्केटच्या नावाखाली ठेवी घेणाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, ठेवीदार हवालदिल नगर जिल्ह्यातील प्रकार
- Advertisement -