Monday, July 22, 2024

रेल्वेखाली उडी घेऊन अल्पवयीन तरुणीची आत्महत्या अहमदनगर मधील धक्कादायक घटना

अहमदनगर-राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी सकाळी ६ वाजता तालुक्यातील टाकळीमिया येथील आरडगाव चौकीच्या परिसरात घडली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, देवळाली प्रवरा येथील रहिवाशी असलेली अल्पवयीन तरुणी राहुरी फॅक्टरी येथील एका खासगी शाळेत इयत्ता १० वीच्या परीक्षेत शिक्षण घेऊन उत्तीर्ण झाली होती. दोन दिवसापूर्वी तिने देवळाली प्रवरातील महाविद्यालयात ११ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता.

आज शुक्रवारी सकाळी ६ अल्पवयीन तरुणी ही सायकल घेऊन देवळाली गावात येथे खासगी क्लाससाठी घरा बाहेर पडली. तिने क्लासला न जाता टाकळीमिया येथील आरडगाव चौकी परिसरात जाऊन रेल्वेखाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. दरम्यान घटनास्थळी पोलीस कर्मचारी हनुमंत आव्हाड यांनी धाव देऊन पंचनामा केला.

अल्पवयीन तरुणीचा मृतदेह राहुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अल्पवयीन तरुणीने आत्महत्या का केली? याचे कारण मात्र समजू शकले नाही. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढिल तपास पोलीस हवालदार हनुमंत आव्हाड करीत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles