१७ व्या लोकसभेतील ५४५ खासदारांपैकी २७० खासदार पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. यापैकी १० खासदारांनी सभागृहाच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेत उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासह इतर ही काही सत्रांमध्ये या खासदारांनी सूचीबद्ध केलेले अनेक प्रश्न सभागृहात चर्चेला आले आणि त्यांची उत्तरे संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी सभागृहात दिली.
लोकसभेत तरुण खासदारांनी हिरेरीने सहभाग घेतल्याचे एक अहवालात स्पष्ट झाल्या नंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी या दहा खासदारांचे विशेष कौतुक केले आहे.
या १० मध्ये अहमदनगरचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा देखील समावेश आहे.विखे यांनी लोकसभेच्या 11 सत्रांमध्ये, सात खासगी विधेयकांच्या चर्चेत सक्रिय सहभाग घेतला असून काही मुद्द्यांवर हस्तक्षेप करत जनते प्रती आपली भूमिका ठाम पणे मांडली. गेल्या ४ वर्षात त्यांनी 496 हस्तक्षेप आणि हरकतीचे मुद्दे मांडले आहेत.
खासदार विखे यांनी पहिल्याच टर्म मध्ये केवळ विकासकामांवर भर न देता विविध कल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्ती पर्यंत कसा पोहचेल या बाबतच्या चर्चेत सहभाग घेऊन योजनांच्या अंमलबजावणीत काही सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या.
दरम्यान नवोदित खासदारांना देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले असून अशाच पद्धतीने जनतेचे प्रश्न मांडण्याचा सल्ला दिला आहे.
देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी लोकसभेत विविध चर्चे दरम्यान आम्ही घेतलेल्या सहभागा बद्दल कौतुक केले असून आम्ही मांडलेले मुद्दे आणि हरकती या देखील त्यांनी पटलावर घेवून त्या त्या नुसार सुधारणा करण्याच्या सूचना केल्या हे आमच्या सारख्या पहिल्या टर्मच्या खासदारांसाठी नक्कीच कौतुकाची थाप मिळाल्या सारखं आहे….!
डॉ.सुजय विखे पाटील
खासदार अहमदनगर (द.)