Friday, March 28, 2025

जिल्हा राष्ट्रवादीची बैठक, सुजय विखेंच्या पाठिंब्यासाठी राष्ट्रवादीचा ४ एप्रिलला मेळावा

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

सुजय विखेंच्या पाठिंब्यासाठी राष्ट्रवादीचा ४ एप्रिलला मेळावा

नगर –  शहरात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण जिल्हा राष्ट्रवादी पक्षाची बैठक नवनियुक्त जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारा संदर्भात प्राथमिक चर्चा झाली तसेच प्रचाराचे नियोजन मतदार संघातील बैठका यांबाबत नियोजन केले. ४ एप्रिलला शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. महायुतीच्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल तसेच उपमुख्यमंत्री व पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या सूचनेनुसार लोकसभा निवडणुकीची व्यूहरचना आखली जाईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर दक्षिण लोकसभा महायुतीचे समन्वयक म्हणून आमदार संग्राम जगताप व   दक्षिण जिल्हाध्यक्ष म्हणून बाळासाहेब नाहटा यांची नियुक्ती केल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, नगर उत्तरेचे जिल्हाध्यक्ष कपिल पाटील, दत्ता पानसरे, कार्याध्यक्ष संजय कोळगे, राज्य सरचिटणीस राजेंद्र गुंड, नगर शहर कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, अजिंक्य बोरकर, वैभव ढाकणे, विजय सुंबे, संतोष ढाकणे, मळु गाडळकर संतोष लांडे निलेश बांगरे, सुरज जाधव, सागर गुंजाळ, जॉय लोखंडे, मोहन गुंजाळ, गणेश गोरे, आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा म्हणाले की, महायुतीचे समन्वयक आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची बैठक आयोजित केली होती या बैठकीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचाराचे नियोजन तसेच मतदारसंघातील पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या बैठकांचे नियोजन केले असून येत्या 4 एप्रिल रोजी शहरात पक्षाचे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. तसेच या पदाच्या माध्यमातून जिल्ह्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विचार पोहोचवण्याचे काम करणार असून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असे काम करू असे ते म्हणाले, यावेळी मोठ्या संख्यने पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles