राहुरी दि.१५ प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार आणि नगर मधून खा डॉ सुजय विखे पाटील निवडून जाणार एवढाच प्रचार करून महायुतीची बाजू मतदारासमोर कणखरपणे मांडा असे आवाहन महायुतीचे उमेदवार खा.सुजय विखे पाटील यांनी केले.
तालुक्यातील गुहा येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन केले.जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या भाषणात खा.विखे पाटील म्हणाले की,केलेले काम आपण जनतेत जावून सांगत आहोत.कारण वर्षानुर्षे समाजासाठी काम करण्याची परंपरा विखे पाटील परीवाराची आहे.सुसंसकृत राजकारण आजपर्यत झाल्यामुळे जनतेचे पाठबळ सातत्याने मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या कोणत्याही कार्यक्रमाला गेले की निवडणुकीची चर्चा होते.पण चर्चेत सहभागी होताना देशात पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आणि नगर मधून सुजय विखे पाटील खासदार होणार एवढेच उतर देण्याचे आवाहन करून फार नकारात्मक वातावरणात जाण्याची गरज नाही.महायुतीला साथ देण्याची मतदारांची भूमिका ठाम असल्याने महायुती करीता ही निवडणूक फक्त मताधिक्यासाठी उरली असल्याचे विखे पाटील म्हणाले.
समाजाच्या प्रत्येक प्रश्नासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून आपण उतर शोधले आहे.दुधाचे अनुदान शेतकार्यांच्या खात्यात वर्ग झाले. अनुदानापासून कोणीही वंचित राहाणार नाही याची काळजी घेतली जाईल आशी ग्वाही देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निर्णयाची योजनांची माहीती गावात आणि आपल्या बुथवर देण्याचे आवाहन करून आपले गाव आणि बुथ याचाच विचार करा उगाच बाकीच्या तालुक्यात काय चालले याचा विचार करू नका असे आवाहन खा.विखे यांनी केले.
राहुरी तलुक्यातील जनता सूज्ञ आहे.विखे पाटील परीवाराला नेहमीच या तालुक्याने पाठबळ दिले.एक परीवार म्हणून या तालुक्याकडे आपण पाहातो.मागील पाच वर्षात तालुक्यात झालेल्या विकास कामांचा लेखाजोखा सर्वाच्या समोर आहे.निळवंडे धरणाचे पाणी देण्याचा शब्द महायुती सरकारने पूर्ण केला.अद्यापही काही काम बाकी आहेत ही काम महायुती सरकारच पूर्ण करणार असल्याचे विखे पाटील याप्रसंगी शिवाजीराव कर्डीले यांनीही मार्गदर्शन केले.
खा.विखे यांचे मोटार सायकल रॅली काढून स्वागत करण्यात आले.अनेक मतदारांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या.सर्वच ठिकाणी कार्यकर्ते नागरीकांनी स्वागत केले.