Wednesday, June 25, 2025

एकट्या शेवगाव तालुक्यातून विखेंना एक लाखाचे मताधिक्य देणार… ‘या’ नेत्याने उचलला विडा

अहमदनगर जिल्हा | शेवगाव तालुक्यात सुजय विखे यांना लाखाचे मताधिक्य देणार*

शेवगाव प्रतिनिधी :: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दहा वर्षांची कारकीर्द चांगली असल्यामुळे तिसर्‍यांदा ते पंतप्रधान होणार आहेतच. त्यांचे हात बळकट करण्यासाठी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना विजय करण्यासाठी महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन भाजपाचे तालुका अध्यक्ष तुषार वैद्य यांनी केले.

आमदार मोनिकाताई राजळे, माजी आमदार नरेंद्र घुले, यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदार संघातून एक लाखाचे मताधिक्य मिळेल असा विश्वास वैद्य यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगामध्ये भारताचा आदरयुक्त दबदबा निर्माण झाला आहे. राज्यामध्ये महायुती आहे. सगळ्यांच्या विचाराने सुजय विखे पाटील यांना नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. त्यांना सर्वांधिक मतांनी विजयी करण्याची जबाबदारी महायुतीच्या सर्वच घटक पक्षांची असल्याने त्यासाठी सर्वानी प्रयत्न करण्याचे त्यांनी सुचित केले.

पारनेर विधानसभेचा लेखाजोखा घेऊन निलेश लंके यांनी मतदारसंघात यावे अन्यथा फक्त पोपटपंची करून निवडणूक जिंकता येत नाही हे लक्षात ठेवावे.स्वाभिमान संवाद यात्रा हे फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी काढलेली यात्रा असून,त्यांच्याकडे सांगायला कोणतेही काम नाही.त्यामुळे खा.विखे यांच्यावर केवळ व्यक्तिगत टिका सुरू केल्याची टिका वैद्य यांनी केली.

मागील पाच वर्षात खा.विखे पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारचा निधी आणून विकास काम केली.कोव्हीड संकटातही जनते करीता त्यांनी राबवलेल्या उपक्रमामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला.विखे पाटील परीवाराची सामाजिक बांधिलकी मोठी असल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराने कितीही बदनामी करण्याचा प्रयत्न केला तरी मतदार संघातील सूज्ञ जनता त्याला थारा देणार नाही असे वैद्य यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles