अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे पाटील विरुध्द निलेश लंके लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. यावर सुजय विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुजय विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. निलेश लंके यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरात मैदानात उतरणार असल्याचे बोलले जाते. यावरून सुजय विखे यांनी बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता निशाणा साधलाय. तर मागच्या वेळेस हे सगळे प्रयोग झाले असून सगळे मैदानात उतरून भाषणे झाले, मात्र जे माणसं आता मैदानात उतरणार आहे. त्यांनी एकातरी माणसाचे जीवन बदलण्यासाठी एखादं काम केलं असेल तर त्यांचे ऐकणार आहे, असा टोमणा सुजय विखे यांनी लगावला आहे.