Tuesday, April 23, 2024

निलेश लंके यांच्या राजीनाम्यावर सुजय विखेंच मोठं वक्तव्य, म्हणाले…

निलेश लंके यांच्या राजीनाम्यावर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला.आज महाविकास आघाडीच्या होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये निलेश लंके यांचे नाव अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून जाहीर होऊ शकते.या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीमध्ये कोणी ना कोणी उमेदवार समोर येणारच आहे. आम्ही निवडणुकीची तयारी आधीपासूनच सुरू केली होती. जनतेपुढे नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामांचे पुस्तक आम्ही ठेवणार आहोत, असं सुजय विखे म्हणाले.आमदार निलेश लंके यांनी माझ्यावर केलेल्या टीकेला माझे कार्यकर्ते उत्तर देण्यास सक्षम असल्याचं विखे यांनी म्हटलं.
अहमदनगर लोकसभा निवडणुकीत आमचा विजय पक्का असल्याचा दावा खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles