23 मार्च रोजी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, पारनेर येथे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांचा वाढदिवस व कार्यकर्त्यांना मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला तालुक्यातील स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे यांच्यावर प्रेम करणारे व सुजित पाटील यांना मानणारे सर्व स्तरातील कार्यकर्ते उपस्थित होते तालुक्यात स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे यांच्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहेत या कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे काम सुजित पाटील यांनी केले आहे हे कार्यकर्ते एक संघ आहेत याची प्रचिती तालुक्याला काल मिळाली मोठ्या संख्येने उपस्थित राहून काही तरुण व काही ज्येष्ठांनी भाषणे केले या कार्यक्रमाला खासदार सुजय विखे यांनी सुद्धा उपस्थिती लावली.
यावेळी काही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले .
स्वर्गीय दादांनी आम्हाला तालुक्यातील सर्व अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी वाढवली पण स्वर्गीय दादा गेल्यानंतर सुजित पाटील व आम्हाला पक्षाने अडचणीत आणण्याचं काम केलं त्यामुळे आम्ही आता यांना मदत करू पण यावेळी आम्ही तुम्हाला सर्व ताकतीने मदत करू तालुक्यातून आमच्याकडून तुम्हाला 25 ते 30 हजाराचं लीड मिळेल आम्ही तुम्हाला सर्व तरी मदत करू पण येणाऱ्या विधानसभेला आम्हाला तुम्ही मदत करावी लागेल अशी अशी प्रतिक्रिया पोखरी गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते निजामभाई पटेल यांनी व्यक्त केली
करंदी गावची ज्येष्ठ नागरिक राधुची ठाणगे बोलताना म्हटले की आमच्या गावात सगळ्यात जास्त काम सुजित पाटील यांनी केले आहे सुजित पाटील काय करतात माहित नाही कोणती सत्ता नसताना कोणापुढे हात पसरून काम मिळवतात त्यामुळे पाटील तुम्ही पुढे चला हे सैन्य तुमच्या मागे उभे आहेत तुम्हीच आमचा पक्ष आहात तुम्ही सांगाल त्याला आम्ही मतदान करणार, धीर सोडु नका या तालुक्यात परिवर्तन नक्कीच होणार आहे. दादांचे आशिर्वाद व तालुक्यातील टोपी वाले तुमच्या सोबत आहेत. सभेत ज्या टोप्या दिसत आहेत ते दादांच्या तालमीत घडलेल्या टोप्या आहेत. त्या तुमचा साथ कधी सोडणार नाही. असे वक्तव्य ज्येष्ठ कार्यकर्ते राधुजी ठाणगे यांनी केले.
आम्ही कायमच सुजित पाटीलांना साथ देत आलोय आणि यापूढे देणार आहोत, पण सध्याच्या राजकारणात तडजोड करावी लागते. दादांच्या काळात राजकारण वेगळे होते सध्या तालुका चुकीच्या दिशेने चालला आहे. विकासकामांना सुजय विखे अग्रेसर आहेत .त्यांचे गल्लीपासुन दिल्लीपर्यंत चांगले वजन आहे. तालुक्याला भरीव निधी दिला त्यामुळे सुजित पाटीलांनी विखें साहेबां बरोबर जावे. आता ग्रामपंचायत ला ५०लाख रुपये लागतात, गटतट जुळवून घेतले पाहिजे . माझ्या आयुष्यात कधी धनुष्यबाणाला मतदान केलं नाही. पण तुमच्या करता आम्ही मतदान केले. तुमची ताकद विखेंना सुद्धा माहीनी आहेत. आपल्य ठरलंय. विखेंच्या खादयांवर मान टाकायची तर ते पण आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही. असे व्यक्तव्य सरपंच बाळासाहेब रेपाळे यांनी केली.
यावेळी सुजित पाटील यांनी बोलताना सांगितले, स्व बाळासाहेब विखे यांना आम्ही कायम मतदान केले होते.राज्यात दुष्काळ पडला असताना राज्यातील पहिली छावणी सुरु केली होती. स्व बाळासाहेब विखे, स्व वसंतराव दादा, वळसे पाटील यांची बैठक झाली होती. त्यामध्ये ठरलं होतं शालीनीताई अध्यक्ष, आणि मी उपाध्यक्ष झालो. पहिले पत्रकार आणि आताचे पत्रकार वेगळे आहेत.त्यावेळी नदीजोड प्रकल्पावरून मंत्री नेते मस्करी करत होते. पण जेव्हा नदीजोड यशस्वी झाल माग वा वा केली . माझे वडील गेल्यानंतर त्यांची खुप आठवण येते. वडील ज्यांचे आहेत ते खूप भाग्यवान आहेत. राजकारणावर बोलताना सुजित पाटील म्हटले,माझ्या जे मनात आहेत तेच ओठात आहे, खासदार साहेब आणि माझी ओळख झाली नसती तर बरं झालं असतं, आज तालुक्याची परिस्थिती वेगळी असती. सुजय विखे हे सृजनशील नेते आहेत. ३५०० लोकांना जो तालुक्यात लाभ मिळाला नो सुजयदांदामुळेच झाला, निवडणूक आली. कोणाला घाटात चाकु दाखवायचा नाही आता आपण मनाने मदत करु आणि बाकी त्यांच्यावर सोडुन देवू निवडणुक आली त्यामुळे हा कार्यक्रम ठेवलेला नाही, घरंदाज माणूस हा घरदाज माणसाच्या मागे असतो. त्यामुळे आपल्याला डाग लावुन घेयचा नाही. त्यामुळे सुजय विखेंना मतदान करायच आहे. घराला राखण माणुस कसा ठेवायचा हे तुम्ही ठरवायचं आहे, असं बोलुन विरोधकांना टोला लगावला. यावर सगळ्यांनी असंच प्रेम राहुद्या.असे प्रतिक्रिया सुजित झावरे पाटील यांनी दिली.
यावेळी खासदार सुजय विखे पाटील बोलताना म्हटले ,झावरे पाटीलांवर प्रेम करणारे सगळे मंडळी आज उपस्थित आहेत. सुजित पाटीलांवर दोन प्रकारचे प्रेम करणारे आहेत. एक मनातून आणि दोन कामापुरते प्रेम करणारे. मी मनापासुन प्रेम करणारृया मध्ये आहे. माझ्या बरोबर राहण्याची जी भूमिका मांडली याबददल आभार मांडतो. राष्ट्रीय वयोश्री योजना फक्त तालुक्यान सुजित पाटीलांमुळे झाले. समोर उमेदवार फायनल होईपर्यंत राजकीय भाष्य करणार नाही. आणि कोणाला उमेदवारी फायनल झाली आहे का आणि झाली तरी त्यांच्यावर बोलण्यासारख काही आहे का तालुक्याला माहिती नाही का सुजित पाटीलांनी घेतलेला जो निर्णय घेताला त्यावर पुढचा उमेदवार जाहीर झाल्यावर स्पष्ट बोलेन. सुशिक्षीत तरुणाना विचारा कोणासारखे होयचे. तो सांगेन त्याला मतदान करा. सोशल मिडीयाचा अत्यंत चुकीचा वापर चालू आहे. सुजित झावरे पाटील यांच्या सारखा मित्र मिळाला हे मी माझे भाग्य समजतो.
बाजार समितीला आमरस भवला आणि समोरच्याला खरेदी विक्रीला बिर्यानी भवली. संघर्षात सुद्धा पाटील उभे आहेत यांचा मला आभिमान त्यांना जो त्रास झाला. तो त्रास सहन करून सुद्धा कार्यकर्त संभाळले पारनेर तालुक्यात सुजय विखे एक मनाने मनाने का होईना पुढे राहील. तालुक्याची जबाबदारी आता तुमच्यावर देयची आहे.असे वक्तव्य खासदार सुजय विखे यांनी केले.
यावेळी अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले, भाजपा तालुकध्यक्ष राहूल पाटील शिंदे, अरूणराव ठाणगे, नगरसेवक युवराज पठारे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबासाहेब खिलारी, नगरसेवक राजू शेख, नगरसेवक निलेश खोडदे, मा.नगरसेवक नंदु औटी, सरपंच मनीषाताई रोकडे, सरपंच पंकज कारखिले, सरपंच शिवाजी निमसे, इंद्रभान गाडेकर, संदीप कपाळे, निजाम पटेल, बाळासाहेब माळी, सरपंच डॉ.विलास काळे, भाऊसाहेब सैद, अमोल मैड, संतोष शेलार, रणजित पाटील , सुरेशशेठ पठारे, रामाशेठ गाडेकर, कैलास कोठावळे, योगेश रोकडे, संग्राम पावडे संजय मते, विलास शेंडकर, शहाजी कवडे, दत्तोबा ठाणगे, राधुजी ठाणगे, ज्ञानदेव शिंदे, विजय आवारी, शंकर महांडुळे, रामदास उगले गुरूजी, सुभाष करंजुले, राजेंद्र रोकडे, माऊली वरखडे ,सुभाष करंजुले, अशोक मेसे ,अमोल रासकर, रवींद्र पडळकर, तसेच तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी देवकृपा प्रतिष्ठान च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम पार पाडला.
यावेळी प्रस्ताविक प्रसाद झावरे व जयसिंग गुंजाळ यांनी आभार मानले.