नगर : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघात लक्ष केंद्रित केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सवानिमित्त विखेंनी मतदारसंघात विविध कार्यक्रम आयोजित करून महिलांना एकत्र आणण्याचा उपक्रम राबविला आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांना सहभागी करून घेण्यात येत आहे. महिलांसाठी आयोजित अशाच कार्यक्रमात माजी खा.सुजय विखे यांनी पत्नी धनश्रीताई विखे यांच्यासह रॅम्प वॉक करून कार्यक्रमाचा आनंद लुटला. विखेंनी खास गॉगल लावून अतिशय आनंदात या कार्यक्रमाचा आनंद लुटला. त्यांच्या रॅम्पवॉकचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल झाला आहे.
माजी खा.डॉ.सुजय विखेंचा पत्नीसह रॅम्प वॉक…गॉगल लावत लुटला कार्यक्रमाचा आनंद..व्हिडिओ
- Advertisement -