Monday, December 9, 2024

संगमनेरकरांनो त्यांना पस्तीस वर्षे दिली, पाच वर्ष माझ्या सारख्या युवकाला संधी द्या

संगमनेर दि.१८ प्रतिनिधी जोर्वे गावाने आजपर्यत केवळ विकासाच्या कामावर विखे परीवाराला साथ दिली.विकास काय असतो हे दाखवून ना.विखे पाटील यांनी दाखवून दिले आहे.आता तालुक्यातील अन्य गावात युवकांच्या सहकार्याने विकासाचे परीवर्तन असेच घडवायचे आहे.तालुक्याने पसतीस वर्ष त्यांना दिली, पाच वर्ष माझ्या सारख्या युवकाला द्या असे आवाहन डाॅ सुजय विखे पाटील यांनी केले.

जोर्वे येथे महीला बचत गटांना जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पीठाच्या गिरणीचे वितरण डॉ विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा शुभारंभ करण्यात आला.गावात उभारण्यात येणार्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.गावातील भजनी मंडळांना साहीत्याचे वाटप करण्यात आले.

आपल्या भाषणात डॉ विखे पाटील म्हणाले की २००९ पासून या गावात विकासाची प्रक्रीया सुरू झाली.या वर्षात ना.विखे पाटील यांनी उपलब्ध करून दिलेला निधी पाहाता यापुर्वी या भागातून आमदार निवडून कसे गेले असा प्रश्न पडतो.शिर्डी विधानसभा मतदार संघात जोर्वे गाव समाविष्ट झाल्या नंतर प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा लागला.कोव्हीड संकटात इथले लोकप्रतिनीधी कुठे होतेॽजेव्हा लोकांना औषधाची आणि रेमडिसिव्हरची गरज होती तेव्हा फक्त विखे पाटील परीवार सर्वाच्या सोबत उभा राहील्याचे सांगून जोर्व्यात एक कोव्हीड सेंटर टाकू शकले नाहीत.गावात पूर आला तेव्हा सुध्दा गावाकडे पाठ फिरवार्यांनी यांना लोकांनी पुरते ओळखले आहेत.जोर्वे गावात दशक्रीया विधीचा घाट बंधला.शेजारील गावांना इथे दशक्रीया विधी साठी यावे लागते
पण काळजी करू नका प्रत्येक गावात दशक्रीया विधी घाट बांधून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

गेली अनेक वर्षे सर्व सतास्थान यांच्या कुटूबांच्या ताब्यात आहेत.तेच ठेकेदार आणि तेच पदाधिकारी अनेक वर्षे पाहायला मिळतात.राहता तालुक्यात सर्व पद सामान्य माणसाच्या ताब्यात आम्ही दिली इथे तर सहकारी संस्था नातेबाईकाच्या ताब्यात आहेत.आमच्यावर दहशतीचा आरोप करता इथेतर सामान्य माणसाच्या आदीवासींच्या जमीनी बळकावण्याच्या घटना मोठ्या घडत आहे मग दहशत कोणाची असा प्रश्न सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात समवाविष्ट झालेल्या गावांना मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला आहे.जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून असलेले बचत गट केवळ कागदोपत्री नाहीत.या महील्यांच्या उदरनिर्वाहा करीता पीठाची गिरणी उपलब्ध करून देत आहोत.येणार्या काळात आणखीही साधन साहीत्य देवून महीलांना अर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न आम्ही करीत असल्याचे डॉ विखे म्हणाले.

राज्यातील महायुती सरकारने अनेक योजना महीला युवक शेतकरी यांच्यासाठी सुरू केल्या.पण एक गोष्ट लक्षात ठेवा योजना युती सरकारच्या आहेत.पण फोटो लावून पत्रक वाटायचे काम विरोधी मंडळी करीत असल्याने महायुतीचे काम विरोधकांना सुध्दा मान्य आहे.पण युती सरकारचे काम लोकांना सांगण्याची वेळ विरोधकांवर आल्याची खोचक टिका डॉ सुजय विखे पाटील म्हणाले.

अनेक वर्षे तालुक्यात रोजगाराचा प्रश्न आहे.एक औद्योगिक वसाहत इथल्या लोकप्रतिनीधीना आणता आली नाही.साडेसात वर्षे मंत्री होते.पण ना.विखे पाटील यांनी शिर्डी मतदार संघातील औद्योगिक वसाहती करीता पाचशे एकर जागा मंजूर करून आणली आता उद्योग येण्यास प्रारंभ झाला असल्याची माहीती त्यांनी दिली.

विकास प्रक्रीयेच्या जोरावरच जोर्व ग्रामपंचायती मध्ये युवकांनी विजय घडवला.आता तालुक्यातील प्रत्येक गावातील युवकांच्या सहकार्याने असेच परीवर्तन आपल्याला घडवायचे आहे.तुमच्या पाहुण्यांंना आणून इथली विकास काम दाखवा आणि आता नातेबाईकांना हळूहळू फोन करायला सुरूवात करा असे सूचक वक्तव्य करून पुन्हा संगमनेरातून लढण्याचे संकेत दिले आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles