Sunday, December 8, 2024

जीवे मारण्याची धमकी… ऑडिओ क्लिपवर सुजय विखेंची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

लोकसभा निवडणूकीचा प्रचार सुरू असतानाच सुजय विखे पाटील यांना जिवे मारण्याच्या धमकीची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा एक ऑडिओ क्लिप कामोठेतील सभेत लावण्यात आली आहे. या क्लिपमधील शिव्या देणारी व्यक्ती माजी पंचायत समिती सदस्य तथा निलेश लंके प्रतिष्ठान मीडिया सेलचा अध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्याला शिव्या दिल्या तो पारनेरच्या कळस ग्रामपंचायतीचा माजी उपसरपंच असल्याचा दावा करण्यात आला आला आहे.

यावेळी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपबाबत बोलताना किती गोळ्या घालायच्या, तेवढ्या घाला. मात्र, सुजय विखे पाटील मागे हटणार नाही. 4 जूनला सुजय विखे पाटील समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करणार, हे स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय समर्थक आणि उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. सगळीकडे उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, अशातच सुजय विखे यांना जीवे मारण्याची धमकी देणारी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. परंतु काहीही झालं तरी मी मागे हटणार नाही, अशी भूमिका सुजय विखे पाटील यांनी या क्लिपवर स्पष्ट केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles