सुप्रिया सुळे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. तसंच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकीत एकूण १० जागा लढवल्या होत्या. त्यातल्या सात जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने विजय मिळवला आहे. बारामतीतल्या विजयानंतर सुप्रिया सुळेंनी आणि अजित पवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे. उत्सुकता होती ती सुनेत्रा पवार या निकालाबाबत काही भाष्य करतात का याची? ते भाष्य त्यांनी केलं आहे. सुनेत्रा पवार यांनी एक पोस्ट करत बारामतीतल्या निकालावर भाष्य केलं आहे.
“लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये जनतेने दिलेला कौल मी नम्रपणे स्वीकारते. हाती आलेले निकाल अनपेक्षित असले तरीही या निकालातून आम्ही आत्मपरीक्षण करु. नव्याने पुनर्बांधणी करु. ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दर्शवून मला मतदान केलं, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. तसंच सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते. सर्व कार्यकर्ते व जनता यांच्या सहकार्याबद्दलही धन्यवाद देते. जनसेवेचा माझा प्रवास इथेच संपत नाही. मी जनसेवेस कायमच तत्पर आहे आणि असेन. पुनश्च आभार!” असं म्हणत सुनेत्रा अजित पवार यांनी पोस्ट केली आहे आणि बारामतीच्या निकालावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
https://x.com/SunetraA_Pawar/status/1798006877005201727?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1798006877005201727%7Ctwgr%5Ed75a532386e15ea588691a784e7c0e72e8577773%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Felections%2Fsunetra-pawar-first-reaction-on-baramati-loksabha-election-result-what-did-she-say-scj-81-4409813%2F