नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रस नेते आणि राज्याचे माजी मंत्री सुनिल केदार यांना कोर्टाने सर्वात मोठा धक्का दिला आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात न्यायालयाने सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. केदार यांच्यासह एकूण सहा जणांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. तर यामधील तिघांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.
हुचर्चित नागपूर जिल्हा सहकारी बँकेतील १५० कोटींच्या घोटाळा प्रकरणाचा निकाल आज सत्र न्यायालयात लागणार आहे. या प्रकरणात कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. सत्र नायलायच्या अतिरिक्त न्यायाधीश जे व्ही पेखळे- पुरकर यांनी हा निकाल दिला.
या प्रकरणात सुनील केदार यांच्यासह अशोक चौधरी, केतन सेठी, अमोल वर्मा, सुबोध भंडारी आणि नंदकिशोर त्रिवेदी या सहा जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर महेंद्र अग्रवाल, ओमप्रकाश पोतदार , सुरेश पेशकर यांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. सुनील केदार यांना दोषी ठरवल्यानंतर कोर्ट काय शिक्षा सुनावणार? याकडे लक्ष लागले आहे. सुनील केदार हे लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना शिक्षेत कमीत कमी शिक्षा सुनावण्याची मागणी वकिलांकडून करण्यात आली आहे.
२००२ मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १५० कोटींहून अधिक रुपयांचा मोठा घोटाळा उघडकीस आला होता. यावेळी सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होते. सुनील केदार हे या प्रकरणात सहआरोपीही होते. आता २२ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला असून यामध्ये सुनील केदार हे दोषी आढळलेत.