नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रस नेते आणि राज्याचे माजी मंत्री सुनिल केदार यांना कोर्टाने सर्वात मोठा धक्का दिला आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात न्यायालयाने सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणी सुनील केदार यांना कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २००२ मध्ये घडलेल्या या बँक घोटाळ्याचा तब्बल २२ वर्षांनी निकाल लागला असून सुनील केदार यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
२००२ मध्ये झालेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५० कोटींच्या घोटाळा प्रकरणाचा निकाल आज (शुक्रवार, २२ डिसेंबर) सत्र न्यायालयात लागला. या प्रकरणात सुनील केदार यांच्यासह एकूण सहा जणांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. या सहाही आरोपींना न्यायालयाने १२ लाखांचा दंड आणि पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
आरोपींमध्ये सुनील केदार यांच्यासह अशोक चौधरी, केतन सेठी, अमोल वर्मा, सुबोध भंडारी आणि नंदकिशोर त्रिवेदी यांच्या नावाचा समावेश आहे. तर महेंद्र अग्रवाल, ओमप्रकाश पोतदार, सुरेश पेशकर यांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.