बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा मोठा चाहतावर्ग आहे. सनी त्याच्या अभिनयामुळे चर्चेत असतो. पण सध्या तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत असतो. पंजाबमधील पठाणकोटमध्ये सनी देओल हरवला असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहेत. तर सनीला शोधणाऱ्याला 50 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे. याआधीदेखील सनी हरवला असल्याचे पोस्टर पठानकोटमध्ये लावण्यात आले आहेत.
सनी देओल लोकसभा निवडणुकीत गुरदासपूर-पठाणकोट मतदारसंघातून निवडून आले. मात्र, निवडून आल्यानंतर एकदाही ते मतदारसंघात दिसले नाहीत. त्यामुळे मतदारसंघातील लोक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. ते बेपत्ता असल्याचे पोस्टर पठाणकोटमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. पठाणकोटमध्ये सनीने काहीही विकास केला नसल्याचं नागरिकांचं मत आहे.पठाणकोट जिल्ह्यातील हलका भोआ येथील सरना बस स्थानकावर सनी देओल बेपत्ता असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहे. याआधीदेखील सनी देओल बेपत्ता झाल्याचे पोस्टर पठाणकोट आणि सुजानपूरमध्ये लावण्यात आले आहेत. संसदेत गेल्यानंतर सनी पठाणकोटमध्ये फिरकला नसून तेथील समस्या सोडवल्या नाहीत असं नागरिकांचं मत आहे. त्यामुळे आता पुन्हा पोस्टर लावत लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बसने प्रवास करणाऱ्या लोकांनाही सनीने पोस्टर वाटले आहेत.
संसदेत गेल्यानंतर सनी देओल पुन्हा आपल्या लोकसभेकडे परतला नाही असा आरोप सनीवर करण्यात आला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सनीला कोणीही तिकीट देऊ नये असा प्रचार पठाणकोटमध्ये करण्यात येत आहे. लोकांना फसवून सनी जिंकला असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.