Wednesday, April 17, 2024

निलेश लंके बरसले… विखे पाटील पिता पुत्रांकडून मला संपवण्याचा प्रयत्न…

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यावेळी बोलतांना
लंके म्हणाले, या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे. ही पारनेरकरांची अस्तित्वाचे लढाई आहे. प्रत्येकांनी मी उमेदवार म्हणून बाहेर पडले पाहिजे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. राजीनाम्याची घोषणा करताना लंके भावूक झाले होते. शरद पवार यांच्याबद्दल लंके म्हणाले, मी देव पाहिला नाही मात्र देवासारखा श्रेष्ठ माणूस म्हणजे शरद पवार आहेत. पवारांनी सांगितले लोकसभा लढवावी लागेल. त्यावर मी लगेच हो म्हणालो. आता शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा लढविणार आहे, असेही लंके यांनी जाहीर केले.

मेळाव्यात लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. लंके म्हणाले, विखे पाटील पिता-पुत्रांनी मला संपविण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करायला लावले. त्यांचे पीए स्वत:चे पीए ठेवतात आणि पैसे उकळतात. पाच वर्षे खासदार आणि राज्यातील मंत्रिपद असूनही त्यांनी विकास कामे केले नाहीत. एवढ्या काळात एकही वैद्यकीय महाविद्यालय यांनी नगरला आणले नाही. कारण त्यांचे खासगी महाविद्यालय आणि रुग्णालय चांगले चालावे यासाठी ते सरकारी संस्था येऊन देत नाहीत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles