Saturday, October 12, 2024

नगर-दौंड महामार्गावरील वाहतूक तब्बल इतक्या दिवस राहणार बंद, पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आदेश

नगर – दौंड रोड असलेल्या नगर- बीड रेल्वे मार्गाच्या क्रॉसिंग पुलाच्या कामामुळे या मार्गावरील वाहतूक मंगळवार दि.१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दि.११ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. ही वाहतूक कायनेटिक चौक ते केडगाव बायपास मार्गे वळविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सोमवारी (दि.३०) दुपारी काढले आहेत.

अहमदनगर ते दौंड जाणारे रस्त्यावर नगर- बीड रेल्वे लाईनला ओलांडणी पुलाचे बांधकामाचा तिसरा टाप्पा सुरु होत आहे. सदर बांधकामासाठी साईटच्या जवळ मोठमोठे गर्डर बणविण्यात आलेले आहेत. सदर गर्डर बसविण्यासाठी मोठे क्रेन व ट्रेलर वापरण्यात येणार आहेत. नमुद रोड हा रहदारीचा असल्याने अपघात होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे अहमदनगर दौंड या मार्गावरील कायनेटीक चौक ते अरणगाव बायपास या रोडवरील वाहतुकीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने दि.१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दि.११ ऑक्टोबर रोजीचे रात्री ८ वाजेपर्यंत अहमदनगर दौंड या मार्गावरील कायनेटीक चौक ते अरणगाव बायपास या रोडवरील वाहतुकीमध्ये खालील मार्गामध्ये बदल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आहेत.

कायनेटीक चौकातुन दौंड रोडने अरणगाव बायपासकडे जाणारे वाहनांकरीता पर्यायी मार्ग – कायनेटीक चौक केडगाव केडगाव वायपास अरणगाव बायपास मार्गे इच्छित स्थळी जातील.

अरणगाव चौकातुन कायनेटीक चौकाकडे येणारे वाहनांकरीता पर्यायी मार्ग अरणगाव बायपास केडगाव बायपास केडगाव कायनेटीक चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

पुणेकडुन दौड रोडला जाण्यासाठी कायनेटीक चौकात येणारे वाहनांकरीता पर्यायी मार्ग केडगाव बायपास अरणगाव बायपास दाँड रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.
उपरोक्त आदेशचे पालन करुन नागरीकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles