Tuesday, February 18, 2025

जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाच्या 25 जागेसाठी रविवारी लेखी परीक्षा

अहमदनगर- जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाच्या 25 जागेसाठी शारिरीक व मैदानी चाचणी पार पडल्यानंतर येत्या रविवारी (7 जुलै) येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. मैदानी चाचणीत किमान 50 टक्के म्हणजेच 25 गुण (50 पैकी) मिळविणार्‍या उमेदवारांमधून एकास दहा या प्रमाणात एकूण 212 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या 25 पोलीस शिपाई व 39 चालक शिपाई अशा 64 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

19 ते 27 जून या कालावधीत शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात आली. मात्र पोलीस चालक शिपाई यांच्यासाठी वाहन टेस्ट बाकी असल्याने त्यांची लेखी परीक्षा नंतर घेण्यात येणार आहे. सध्या पोलीस शिपाई पदासाठी येत्या रविवारी लेखी परीक्षा होणार आहे. पोलीस शिपाई पदाच्या 25 जागा असून त्यासाठी एकूण 879 उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली होती. त्यापैकी 441 उमेदवारांना 25 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत. सदर उमेदवारांमधून एकास दहा या प्रमाणात प्रवर्गनिहाय एकूण 212 एवढेच उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसारीत करण्यात आली आहे.

येत्या रविवारी येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी सात वाजता लेखी परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी महाआयटीच्या संकेतस्थळावर जाऊन हॉल तिकीट डाऊनलोड करून घ्यावे. परीक्षेसाठी पहाटे पाच वाजता पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उपस्थित राहण्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कळविले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles