Saturday, April 26, 2025

मोठी बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला…

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 31 डिसेंबरपर्यंत शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी सुनावणी घेऊन अंतिम निर्णय जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अतिशय वेगाने घडामोडी घडल्या. विधानसभा अध्यक्षांनी सलग काही आठवडे सुनावणी घेतली. शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांची उलटसाक्ष नोंदवण्यात आली. या दरम्यान दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये खटके देखील उडाले. या सगळ्या घडामोडींनंतर सुनावणी अंतिम टप्प्यावर आली आहे. पण तरीदेखील 31 डिसेंबरपर्यंत निकाल जाहीर करणं शक्य नसल्याची भूमिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची होती. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यांच्या या मागणीवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने राहुल नार्वेकर यांना सुनाणीसाठी 10 जानेवारीपर्यंतची मुदतवाढ दिली आहे.

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचं म्हणणं होतं की विधानसभा अध्यक्षांचा सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न आहे. पण राहुल नार्वेकर यांची बाजू मांडणारे वकील तुषार मेहता यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता. कोर्टाने तीन आठवड्यांचा वेळ दिला नाही. पण दहा दिवसांचा वेळ वाढवून दिला. त्याआधी शिवेसनेचा निर्णय राहुल नार्वेकर यांना निकाल द्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली.

राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टात केलेल्या अर्जात स्पष्ट म्हटलं आहे की, मी निकाल 20 डिसेंबरला राखून ठेवणार आहे. पण मला तीन आठवडे वाढवून द्या. कारण मला जजमेंट लिहावा लागेल. त्यामुळे कोर्टाने सांगितलं की आम्ही तुम्हाला 10 जानेवारीपर्यंतचा वेळ देतो. ते राहुल नार्वेकर यांच्या वकिलांनी देखील मान्य केलं, असं वकील सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles