दारू घोटाळा प्रकरणी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी डिसेंबरमध्ये होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने तपास यंत्रणा ईडीला डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले आहे. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने संजय सिंह यांना कनिष्ठ न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्याची सूचना केली आहे सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आप नेते संजय सिंह यांना सांगितले की, अटकेला आव्हान देण्याऐवजी त्यांनी खालच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज करायला हवा होता. यासोबतच संजय सिंह यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने तपास यंत्रणा ईडीला नोटीस बजावली असून डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.
दरम्यान, ईडीने 4 ऑक्टोबर रोजी संजय सिंह यांना दारू घोटाळा प्रकरणी अटक केली होती, त्यानंतरपासून ते अजूनही न्यायालयीन कोठडीत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने 20 ऑक्टोबर रोजी त्यांची याचिका फेटाळली होती. कायदा सर्वांसाठी समान आहे, मग तो नेता असो वा सामान्य नागरिक, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. न्यायालयाने म्हटले आहे की, संजय सिंह यांना कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे. तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची गरज नाही.
च्च न्यायालयानंतर संजय सिंह यांनी आपल्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ईडीच्या आरोपपत्रात संजय सिंह यांच्यावर 82 लाख रुपयांच्या देणग्या घेतल्याचा आरोप आहे.