Wednesday, April 17, 2024

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतमोजणीची पडताळणी व्हावी, सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाला नोटीस बजावून मतमोजणीवेळी व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल मधील सर्वच पावत्यांची मोजणी करावी, असे निर्देश दिले आहेत. याआधी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही पाच ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची पडताळणी केली जात होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेनुसार सर्वच व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.

सामाजिक कार्यकर्ते अरुण कुमार अग्रवाल आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्म्स या एनजीओने सदर याचिक दाखल केली होती. या याचिकेवर न्या. बीआर गवई आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने निकाल दिला.व व्हीव्हीपॅट स्लीपची मोजणी तर झालीच पाहीजे. तसेच व्हीव्हीपॅट यंत्रामधून आलेली पेपर स्लीप मतदाराने प्रत्यक्ष पाहून त्यानेच ती मतपेटीत टाकण्याची परवानगी द्यावी, असे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशीही मागणी याचिकेत करण्यात आली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles