४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात सर्वांचे लक्ष महाराष्ट्रातील बारामती मतदारसंघाकडे होते. बारामती मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय म्हणजेच सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होती. या निवडणुकीच सुप्रिया सुळे जवळपास १ लाखांहून अधिक मताधिक्यानने निवडून आल्या आहेत. सुप्रिया सुळे यांचे फक्त महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण जगभरात अभिनंदन केले जात आहे. सुप्रिया सुळेंसाठी अभिनंदनाचे बॅनर न्यु यॉर्क मधील टाईम्स स्क्वेअरवर झळकले आहेत.
न्यू यॉर्कमधील टाईम्स स्क्वेअर हा खूप प्रसिद्ध आहे. येथे अनेक लोकांचे फोटो-पोस्ट दाखवल्या जातात. तर आता लोकसभा निवडणुकीनंतर सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचे बॅनर टाईम्स स्क्वेअरवर झळकले आहेत. त्यामुळे पवार कुटुंबियाची लोकप्रियता संपूर्ण जगभरात आहे.
सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे पोस्टर परीक्षित तळोकार यांनी लावले होते. सुप्रिया सुळे यांच्या फॅनपेजवरुन हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यावेळी सुप्रिया ताईंना विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.