Wednesday, April 30, 2025

आ. निलेश लंके म्हणाले… पवार कुटुंब एकत्र आले पाहिजे, सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दात म्हणाल्या

मविआच्या काळात ज्या गोष्टींची कमतरता होती ती पूर्ण करण्यास यश आलं. पण, भोर उपजिल्हा रुग्णालयात टेक्निशियनं मिळतं नाही हे अपयश आम्हाला सातत्याने दिसत आहे. गेले अनेक महिने आम्ही याचा पाठपुरावा सरकारकडे करत आहोत. तीन महिन्यांपूर्वी सरकारने शब्द दिला होता की इथे भरती होईल. मात्र, तीन महिने उलटूनही आरोग्य विभागाची भरती झालेली नाही. आज सुविधा आहेत पण त्याला चालवणारा माणूस नाही, अशी टीकाही सुळे यांनी यावेळी केली.

ट्रिपल इंजिनचं खोके सरकार आहे. यांची आपापसातली भांडण संपतील तेव्हा ते राज्यासाठी काही तरी करतील. त्यांना फक्त इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आणि त्याच्यातून होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात ते व्यस्त आहेत. इतिहासात पहिल्यांदा असं झालं असेल की कॅबिनेटमध्ये वैयक्तिक भांडण झाली. हे महाराष्टाचं दुर्दैव आहे. यामध्ये महाराष्टातील सर्व सामान्य माणूस भरडला जातोय. महाराष्ट्रच्या दुष्काळाबाबत सरकारला पॉलिसी पॅरालिसिस झालेला आहे अशी जळजळीत टीकाही त्यांनी केली
सत्तेसाठी ट्रिपल इंजिनचं सरकार एकत्र आले आहे. महाराष्ट्रमध्ये यांच्यात भांडण झाली की जे स्वतःला स्वाभिमानी म्हणणारे आहेत त्यांना सातत्याने दिल्ली दरबारी जावं लागतयं असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. महाराष्ट्राला अस्थिर करण्याचे पाप हे ट्रिपल इंजिनचं सरकार करतंय. 200 आमदार आहेत त्यांच्याकडे मग इथून काही तरी निर्णय घेऊन दिल्लीला का पाठवत नाहीत असा सवाल त्यांनी केला.

आमदार निलेश लंके यांनी पवार कुटुंब एकत्र आले पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर बोलतान त्या म्हणाल्या, पवार कुटुंब हे एकचं आहे. आमची लढाई ही वैचारिक आहे, वैयक्तिक नाही. सातत्याने मी माझी भूमिका यासंदर्भात स्पष्ट केली आहे. त्यामुळं वैचारिक भूमिकेबाबत कसं कॉम्प्रमाईज करणार, असा खरमरीत सवाल त्यांनी केला. आम्ही पाटावर जेवायला बसलो की आमचं ताट हिसकावून घेण्याचे काम केंद्र सरकार आणि अदृश्य शक्ती करत राहणार. मराठी लोकांच्या दीड ते दोन लाख नोकऱ्या दुसऱ्या राज्यात का गेल्या? राज्यातले मराठी पक्ष आहेत तेच कसे काय फुटतात? अशी टीकाही त्यांनी केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles