राज्यातील सर्व राजकीय पक्षांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. सर्व पक्षातील नेत्यांनी आगामी निवडणुकीसाठी पक्षबांधणी आणि रणनीती आखायला सुरुवात केली आहे. काही पक्षांमध्ये लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा सुरु झाली आहे.
याचदरम्यान, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चा सुरु आहे. या मोर्च्याच्या पदयात्रेत सुप्रिया सुळे यांनी आगामी निवडणुकीसाठी लढाऊ प्रतिज्ञा घेतली आहे. ‘पहिली लोकसभा, दुसरी विधानसभा निवडणुकीचा गुलाल घेऊनच घरी यायचे. मी दहा महिने घरी जाणार नाही, असा निश्चय खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
शेतकरी आक्रोश मोर्च्यातील सभेत सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘एक रुपया कडीपत्ता सरकार झाले आहे. आम्ही पाण्याच्या प्रश्नावर कधीही राजकारण केलेले नाही. करणारही नाही. पण सरकारने पाण्याचा प्रश्न गांभीर्याने घ्यावा. मागील दहा वर्षात संसदेत आरक्षणावर सर्वात जास्त कोण बोलले असेल तर मी बोलले आहे. मराठा, लिंगायत, धनगर , मुस्लिम आरक्षणासाठी भांडत राहणार. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकाच आईची दोन मुले आहेत’