लोकसभेचा निकालापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठे बदल करण्यात आले आहे. सुप्रिया सुळे आणि पी.सी. चाको यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर राजीव झा यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीत फू़ट पडल्याल्यापासून हे पद रिक्त होतं. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पलडी या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे.
पी.सी. चाको हे केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. 10 मार्च 2021 रोजी राजीनामा देईपर्यंत ते काँग्रेसचे सदस्य होते. चाकोला मोठा राजकीय इतिहास आहे. त्यांनी भारतीय युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. तसंच पक्षात विविध पदे भूषवली आहेत. 2021 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला होता. सध्या ते NCP च्या केरळ राज्य युनिटचे अध्यक्ष आहेत.
शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांच्यावर राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र प्रफुल पटेल अजित पवरांसोबत गेल्यानंतर हे पद रिक्त होतं. शरद पवार आज इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले आहेत. त्याआधी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पार पाडली. या बैठकीत पी.सी. चाको आणि सुप्रिया सुळे यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवडक करण्याचा निर्णय घेण्यात आला.