राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनीच पक्षात बंड केल्याने ही फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासोबत तब्बल 40हून अधिक आमदार पक्ष सोडून गेले आहेत. या बंडखोरांनी भाजपसोबत हातमिळवणीही केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत भूकंप झाला आहे. पक्षातील बंडाच्या या वादळाला रोखण्यासाठी स्वत: शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी थेट संवाद साधायला सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
आलं तर आलं तुफान… pic.twitter.com/YduO20VplI
— Supriya Sule (@supriya_sule) July 7, 2023