Monday, April 28, 2025

सुप्रिया सुळेंच्या ‘बाबां’ना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, हृदयस्पर्शी पोस्ट…

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ८३ वा वाढदिवस आहे. शरद पवार यांचा आजचा वाढदिवस काहीसा वेगळा आहे. कारण प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीतला शरद पवार यांचा सर्वात संघर्षाचा काळ आहे. पक्ष फुटल्यानंतर या कठीण प्रसंगाचा देखील शरद पवार मोठ्या हिमतीने सामना करताना दिसत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘लढेंगे-जितेंगे’ म्हणत शरद पवार यांच्यासाठी खास पोस्ट लिहत शुभेच्छा दिल्या आहेत
सुप्रिया सुळे यांची पोस्ट
आधी लढाई जनहिताची !!!

प्रिय बाबा , आज तुमचा वाढदिवस. खरं तर तो केवळ आमच्यासाठी वाढदिवस, तुम्हाला सर्व दिवस सारखेच. लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती.

मायबाप जनतेच्या शुभेच्छा, आशिर्वाद आणि डॉक्टरांची अनमोल साथ यांच्या बळावर साहेब आज आपण वयाची ८३ वर्षे पूर्ण करत आहात. ही मोठी आनंदाची बाब आहे. आम्ही सर्वजण त्यांच्याप्रती अंतःकरण पूर्वक कृतज्ञ आहोत आजी शारदाबाई (बाई) आणि आजोबा गोविंदराव आबा यांनी जे जनसेवेचे व्रत आपणावर सोपवले आहे त्याच्याशी आयुष्यभर आपण कटिबद्ध आहोत. जनहिताची पूर्ती होणं हाच तुमचा ध्यास आणि आनंद आहे. तुम्हाला त्यासाठी आम्ही सर्व साथ-सोबत असणं म्हणजेच तुमचा वाढदिवस साजरा करणं होय.

संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हा सर्वांनाच सार्थ विश्वास आहे.

लढेंगे-जितेंगे !! बाबा , तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles