व्हायरल व्हिडीओ सुरतचा आहे. सुरतच्या डुमास येथे स्थायिक विजयभाई पटेल अनेक वर्षांपासून त्यांचे चहाचे दुकान चालवत आहेत. विजयभाई पटेल यांनी बनवलेल्या चहाचा आस्वाद घेण्यासाठी येथे लोक लांबून तर येतात. पण, यांचा मधुर आवाज ऐकून मंत्रमुग्धही होतात. कारण – हे चहा बनविताना त्यांच्या मधुर आवाजात सुरेल गाणी देखील गातात. त्यामुळे त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. विजयभाई पटेल १९७२ च्या ‘अमर प्रेम’ चित्रपटातील किशोर कुमारचं ‘चिंगारी कोई भडके’ हे गाणं गात त्यांच्या स्टॉलवर चहा तयार करताना दिसत आहेत. विजयभाई पटेल एका शेगडीवर चहा बनवीत आहेत. तसेच दुसऱ्या बाजूला त्यांनी हातात माईक सुद्धा धरला आहे आणि स्टॉलच्या एका साईडला त्यांचा मोबाईल ठेवून, त्यातील गाण्याच्या ओळी वाचून ते गाणं सादर करत आहेत. डॉली चायवालानंतर, सुरतच्या ‘गाणं गाणाऱ्या चहा विक्रेत्याच्या’ हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
- Advertisement -