प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होण्याआधीच भाजपने खातं खोललं आहे. भाजपने गुजरातमधील सुरत या जागेवरून विजय मिळवला आहे.
सुरत लोकसभेतून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले आहेत. या जागेवर काँग्रेसचे उमेदवार निलेश कुम्भानी यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवण्यात आला होता. प्रमुख विरोधी उमेदवाराचा उमेदवारी अर्जच बाद झाल्यामुळे दलाल यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. कुम्भानी यांचा अर्ज रद्दबातल झाल्यानंतर या जागेवर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेल्या इतर उमेदवारांनीही आपले अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे या जागेवर निवडणूक लढवणारे मुकेश दलाल हे एकमेव उमेदवार असल्याने त्यांना बिनविरोध विजयी उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं होतं.