Wednesday, February 12, 2025

लोकसभेला पंकजा मुंडेंचा पराभव धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळेच झाला, कारण..

धनंजय मुंडेंपेक्षा आकाची दहशत बीडमध्ये जास्त आहे. वाल्मिक कराडने धनंजय मुंडेंना वश केलं आहे. धनंजय मुंडेंना मित्रच शिल्लक राहिला नाही कारण आकाने त्यांचा मित्रच शिल्लक ठेवला नाही, तसंच लोकसभेला पंकजा मुंडेंचा पराभव हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळेच झाला असा दावा सुरेश धस यांनी केला आहे.

बजरंग सोनावणे लोकसभा निवडणुकीत निवडून आले. धनंजय मुंडे आणि बजरंग सोनावणे फार चांगले मित्र होते. या दोघांच्या मैत्रीचं वाटोळं विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांनी केलं. तेव्हापासून बजरंग सोनावणे विरोधात गेले, ते गेले नसते तर पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीत पडल्या नसत्या. दुसऱ्या कुणालाही उमेदवारी दिली असती तरीही पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या. बजरंग सोनावणेंसारखा तगडा उमेदवार तिकडे गेल्याने फटका बसला. छाती फाडली तर एका बाजूला अजित पवार दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे दिसतील असं बजरंग सोनावणे म्हणाले होते. मात्र लोकसभेला पंकजा मुंडेंचा पराभव हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळेच झाला.

पंकजा मुंडेंचा लोकसभेच्या पराभवानंतर माझ्याविषयी गैरसमज झाला. आता तो माझ्याबद्दलच का झाला ते मला माहीत नाही. पंकजा मुंडेंची सीट निवडून आली नाही कारण लोकसभा निवडणुकीला बीड तालुक्यात ९८ हजार मतं विरोधात गेली. ही मतं कुणामुळे विरोधात गेली? यांच्याच कृपेमुळे आम्ही हरलो. सगळ्यांचं प्रारब्ध आम्ही ठरवू असं धनंजय मुंडे म्हणाले होते. आमचं प्रारब्ध तुम्ही ठरवणार म्हणजे तुम्ही काय मालक झाले का? या सगळ्यामुळे पंकजा मुंडेंचा पराभव झाला. वाल्मिक कराडच्या दादागिरीचा प्रसार आणि प्रचार झाला. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामुळेच पंकजा मुंडेंचा पराभव झाला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles