Tuesday, May 28, 2024

…या सगळ्याचा अर्थ फडणवीसांना विनोद तावडेंनी चितपट केलं आहे

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सवर (ट्विटर) केलेल्या एका पोस्टचीही अशीच चर्चा चालू आहे.
सुषमा अंधारे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे यांची नावं घेऊन खोचक शब्दांत टिप्पणी केली आहे. विनोद तावडेंनी देवेंद्र फडणवीसांना चितपट केल्याचा दावा सुषमा अंधारेंनी केला असून त्यासाठी काही घडामोडींचा दाखला त्यांनी या पोस्टमध्ये दिला आहे. “पंकजा मुंडे-महादेव जानकर यांना उमेदवारी, जळगावचा जाहीर उमेदवार बदलण्याची तयारी, एकनाथ खडसे यांची पुन्हा अमित शाह यांच्याशी भेट, देवेंद्र फडणवीसांना भेटीसाठी दोन-दोन दिवस वाट पाहावी लागणं, पण त्याचवेळी नवनीत राणा यांना मात्र तासाभरात भेट… या सगळ्याचा अर्थ फडणवीसांना विनोद तावडेंनी चितपट केलं आहे”, अशी पोस्ट सुषमा अंधारे यांनी केली आहे. या पोस्टसोबत ‘आताकधीचयेणारनाही’ असा हॅशटॅगही त्यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ या व्हायरल घोषणेवरून हा खोचक टोला लगावल्याचं बोललं जात आहे.https://x.com/andharesushama/status/1776658197287518351

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles