Sunday, December 8, 2024

उठा उठा देवेंद्रजी…पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली..Video

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सातत्याने भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर आता सुषमा अंधारेंनी शेअर केलेल्या एका व्हिडीओची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये सुषमा अंधारेंनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या पोस्टमध्ये सुषमा अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. “उठा उठा देवेंद्रजी, पोलिसांची गाडी थांबली. पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली. कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगुज की देवघेव? मग हळूच निर्जन स्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकिटं पुरवली जात आहेत? स्थळ: पुणे जेल रोड”, असं सुषमा अंधारेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles