Suzukiसुझुकी मोटरसायकल इंडियाने लोकांच्या सेफ्टीचा विचार करून त्यांच्या वाहनांना रिकॉल जारी केले आहे. 30 एप्रिल 2022 ते 3 डिसेंबर 2022 दरम्यान उत्पादित झालेल्या वाहनांसाठी कंपनीने रिकॉल जारी केला आहे. सुझुकीच्या या वाहनांमध्ये Access 125, Burgman Street 125 आणि Avenis 125 या मॉडेलचाही समावेश आहे.30 एप्रिल 2022 ते 3 डिसेंबर 2022 दरम्यान उत्पादित झालेल्या वाहनांसाठी कंपनीने रिकॉल जारी केला आहे. सुझुकीच्या या वाहनांमध्ये Access 125, Burgman Street 125 आणि Avenis 125 या मॉडेलचाही समावेश आहे. सुझुकी इंडियाने इग्निशन कॉइलला जोडलेल्या हाय-टेन्शन कॉर्डमधील दोष लक्षात घेऊन हे रिकॉल जारी केले आहे. कंपनीने म्हटले आहे की हाय-टेन्शन कॉर्ड ड्रॉइंगच्या गरजेशी जुळत नाही. बाईक किंवा स्कूटर चालू असताना इंजिन ऑसीलेशन होते, ज्यामुळे इग्निशन कॉइलमधील वायर वाकते आणि वारंवार वाकल्यामुळे तुटते. त्यामुळे अडचणी निर्माण होतात.
Suzuki कंपनीने सुमारे 4 लाख दुचाकी परत मागवल्या…मोठं कारण आलं समोर
- Advertisement -