टी-20 विश्वचषकात रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेला 7 धावांनी नमवले आणि दुसऱ्यांदा टी-20 विश्वविजेतेपदावर नाव कोरले. विजयानंतर प्रत्येक खेळाडू आनंदात न्हाहून निघाला होता. यावेळी रोहित शर्मा वेगळ्याच मूडमध्ये दिसला. यावेळी जेतेपदाची ट्रॉफी घेण्यासाठी जाताना रोहित शर्माने केलेल्या कृतीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. जेतेपदाची ट्रॉफी घेताना रोहित शर्माच्या अंगात लियोनल मेस्सीचं भूत संचारलं होतं, असं म्हटलं वावगं ठरणार आहे. मेस्सीची फुटबॉल कारकीर्दही अशीच काहीशी होती. वर्ल्डकपचं स्वप्न उराशी बाळगून अनेक वर्षे काढली. अखेर शेवटच्या टप्प्यात जेतेपदावर नाव कोरलं. असंच काही रोहित शर्माचं झालं आहे. टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेण्यापूर्वी जेतेपदाचं स्वप्न पूर्ण झालं आहे.
T20 World Cup 2024 विश्वचषक घेताना रोहित शर्माची अनोखी एन्ट्री…Viral Video
- Advertisement -