पाकिस्तान क्रिकेट संघावर वेस्ट इंडिज-अमेरिकेत सुरू असलेल्या ट्वेन्टी२० वर्ल्डकप स्पर्धेत नवख्या अमेरिकेविरुद्ध पराभवाची नामुष्की ओढवली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १५९ धावांचीच मजल मारली. अनेकविध देशातून अमेरिकेत स्थायिक झालेल्या खेळाडूंचा भरणा असलेल्या अमेरिकेने शिस्तबद्ध खेळ करत १५९ धावा केल्या आणि सामना टाय झाला. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने १८ धावा केल्या. स्वैर गोलंदाजी आणि अगम्य क्षेत्ररक्षणाचा पाकिस्तानला फटका बसला. पाकिस्तानला हे लक्ष्य मानवलं नाही आणि त्यांना १३ धावाच करता आल्या.
T20 World Cup…. नवख्या अमेरिकेने पाकिस्तानलाही धूळ चारली… सुपर ओव्हरमध्ये पराभव
- Advertisement -