तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमध्ये झील मेहतानं सोनूची भूमिका साकारली होती. झील मेहता ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. झीलच्या बॉयफ्रेंडनं तिला लग्नासाठी प्रपोज केले आहे.छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमुळे अभिनेत्री झील मेहताला विशेष लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये तिनं ‘भिडे मास्तर’ यांची लेक सोनूची भूमिका साकारली होती. झील मेहता ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. झीलच्या बॉयफ्रेंडनं तिला लग्नासाठी प्रपोज केले आहे. नुकताच झीलनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये झीलचा बॉयफ्रेंडनं तिला फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज करताना दिसत आहे.
झीलला फिल्मी बॉयफ्रेंडनं स्टाईलमध्ये केल प्रपोज
झीलनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती पिंक कलरचा ड्रेस आणि मोकळे केस अशा स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये झीलचा होणारा पती डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओला झीलनं कॅप्शन दिलं, “कोई मिल गया, मेरा दिल गया”