पत्नीच्या नवे असलेल्या जमिनीची फेरफार नोंदी करायची होती. हि नोंद करण्यासाठी तलाठीने ८० हजार रुपयांची मागणी केली. मात्र तडजोडीअंती ठरलेली ४० हजराची रक्कम स्वीकारताना तलाठीला रंगेहाथ पकडण्यात आले. परभणीच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. दत्ता होणमाने असे एसीबीने ताब्यात घेतलेल्या तलाठ्याने नाव आहे. सदर प्रकरणात तक्रारदाराच्या पत्नीचे नावे असलेल्या जमिनीची फेरफार नोंदी करण्यासाठी तक्रारदार पूर्णा येथील तलाठी कार्यलयात गेले होते. या ठिकाणी तलाठीची भेट घेतळी असता तलाठी दत्ता होनमाने याने तक्रारदाराकडे ८० हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र तडजोडीअंती ४० हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. याची पडताळणी करून एसीबीने सापळा रचला.
तडजोडीअंती ठरलेली ४० हजारांची रक्कम स्वीकारनाऱ्या दत्ता होणमाने पूर्णा तालुक्यातील फुलकळस तलाठी याला ताब्यात घेतलं आहे. लाचखोर तलाठ्याने प्रती गुंठा ४० हजार रुपये प्रमाणे एकूण ८० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र एसीबीने सदर तलाठ्यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी ताडकळस पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.